Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.प्रविण येरमे यांच्या बदलीच्या निषेधार्थ रॅली !

राजुरा, कोरपना, गोंडपिंपरी, जिवती तालुक्यातील जनेतेने निषेध रॅलीत उपस्थित राहावे - बहुजन कृती समिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवेचा ध्यास घेऊन आदिवासी समाजाचे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षित ध्येय गाठून स्वतःच्या स्वार्थाचा आर्थिक व प्रगती हेतू न ठेवता आपले सेवा व कर्तव्य पार पाडणाऱ्या ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण येरमे यांनी कोरोना काळात राबविलेले उपक्रम सामाजिक चळवळ हे फक्त आदिवासी म्हणून नव्हे तर सर्व समाजासाठी शासनाचे कर्तव्य पार पाडून दोन वर्ष समाजासाठी राबवलेली सेवा, उपक्रम ज्यामुळे हजारो आर्थिक कमकुवत कोरोना काळात भयभीत व दहशतीमध्ये असलेल्या अनेक समाजाच्या परिवारांना ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे मार्गदर्शन ऑक्सिजन औषध कमी खर्चात कोणताही आर्थिक लाभाचा हेतू न ठेवता लोकांची सेवा केली आहे.

कोरोनासारख्या जागतिक महामारीत आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना योद्धयाची उत्कृष्ठ भूमिका निभावणारा व कोरोनासारख्या महामारीत रुग्णसेवा करताना घरातील एक डॉक्टर देशाला अर्पण करणारा व्यक्ती आज वाईट कसा ? डॉ. प्रवीण येरमे यांच्या सेवेची दखल घेऊन एकेकाळी आपल्याच व्यवस्थेने त्यांना कोरपना भूषण पुरस्कार देऊन पाठ थोपटली होती.शासकीय कर्तव्य पूर्ण करून उर्वरित वेळेत स्वखर्चातून प्रचंड बजेट असणारे मिशन ग्रॅज्युएट, मिशन पोस्ट ग्रॅज्युएट, मिशन पी.एच.डी., संविधान जागृती, संविधानाच्या १००० प्रतीचे मोफत वितरण, समाजव्यवस्था व संस्कृती टिकवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गाव पाटलाचा सन्मान, गाव पाडे, तांडे, गुडे यावर जाऊन आरोग्य विषयक जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांची निर्मिती, गरोदर माता जनजागृती, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, नवजात बालकांच्या जन्माचे स्वागत म्हणून बोधिवृक्ष (पिंपळ वृक्ष) तसेच वडाचे वृक्ष देऊन मातांचे स्वागत असे अनेकानेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गरिबाचा मार्गदर्शक म्हणून पुढे आलेल्या डॉ. प्रवीण येरमे यांच्या सामाजिक कार्य नीच्च राजकारणी लोकांना पचनी पडले नाही.

रुग्णालयातील सहकारी, रुग्णालयातील शासकीय कर्मचारी, उपचार घेणारे रुग्ण किंवा इतरत्र विभागीय चौकशी नसताना रातोरात अचानक ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे बदली झाल्याचा आदेश धडकतो. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पहिलेच अनेक पदे रिक्त असताना व ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे आधीच पाच डॉक्टर कार्यरत असताना या ठिकाणी बदलीने अतिरिक्त डॉक्टर देण्याची गरज काय? यामागे मोठे राजकीय कटकारस्थान आहे. कारण नसताना गडचांदूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण येरमे यांच्या बदलीचे कारण काय ? बदलीसाठी कोणाचा राजकीय दबाव होता? राजकीय ताकद वापरून प्रशासनावर दबाव आणणारा तो राजकीय समाजकंटक कोण ? याचा जाब विचारण्यासाठी तळागाळातील बहुजन जनतेने ५ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके चौक ते ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे होणाऱ्या निषेध रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन कृती समितीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये