Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घाटकुळ येथे म.ज्यो.फुले विद्यालयात एनएसक्युएफ विषयावर मार्गदर्शन संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ येथे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘एनएसक्युएफ अभ्यासक्रम’ या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ निदेशक बंडोपंत बोढेकर यांना पाचारण करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. निमसरकार होते. गणित अध्यापक रामकृष्ण चनकापुरे, व्ही.जी. राजुरकर, आर.जी. खोब्रागडे, ए.पी. मेदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास याचा एकात्मिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टीने नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अभ्यासक्रम सहाय्यभूत ठरणारा आहे . या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत प्रात्यक्षिकरूपी प्राथमिक ज्ञान दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात कौशल्य अभिरूची विकसित होऊ शकते, असे याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले.‌

  सूत्रसंचालन के.डी. ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद देशमुख यांनी केले. नागपूर श्रीगुरुदेव सेवाश्रम अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे वतीने घेण्यात आलेल्या शालेय स्तरावर राष्ट्रसंतांच्या साहित्यावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर जिल्हास्तरीय स्पर्धेचे शाळेत उत्तम आयोजन केल्याबद्दल तसेच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी विविधांगी उपक्रम राबविल्या बद्दल रामकृष्ण चनकापुरे यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या विद्यालयातील सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये