ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

8 सप्टेंबर ला गडचांदूर येथे रिपब्लिकन चळवळीच्या चिंतन बैठकीचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे तारीख ८ सप्टेंबर २०२४ रोज रविवारला सकाळी ११ : ३० वाजता चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पक्षाच्या पुनर्बांधणीची दिशा.

आणि अनुसूचित जातीचे वर्गिकरण क्रिमिलेयर आणि बौद्धांचे आरक्षण.

या विषयांवर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंतन बैठक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य रमेश पाटील (महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सोनुर्लि )राहणार आहेत. या विषयावर महाराष्ट्रातील ख्याती प्राप्त, प्रसिद्ध रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने, यवतमाळ हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय प्रचारक देवानंद लांजेवार, अमरावती आणि प्रसिद्ध लोककलावंत डॉ. निर्मल सरदार, अमरावती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 चळवळीतील सतत भेडसावणाऱ्या गंभीर समस्या, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खंबीरपणे सम्यक चर्चा घडवून समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी आपण आले पाहिजे. आपण अगत्याने सहभागी होऊन बैठक यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजक रिपब्लिकन जागृती अभियान यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अशोककुमार उमरे, 8698842402 यांच्याशी संपर्क साधावा.असे कळविण्यात आले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये