Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत तालुकास्तरीय मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी छत्रपती. शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजा या ठिकाणी तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन 28 ऑगस्ट रोजी करण्यात आले. या मेळाव्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजना लाभार्थी घटकापर्यंत पोहोचविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले

या मेळाव्या चे उद्घाटन देऊळगाव राजा नगरपरिषद चे प्रशासक तथा मुख्या धिकारी मा.श्री अरुण मोकळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यांनी मेळाव्यामध्ये योजनांबद्दल मार्गदर्शन केले ,याप्रसंगी देऊळगाव राजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. दादारावजी मुसदवाले प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले त्यांनी सुद्धा योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे असे मत व्यक्त केले तसेच या तालुकास्तरीय मेळाव्यामध्ये प्राचार्य श्री.संजय देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद विद्यालय देळगाव राजा यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी नोडल अधिकारी म्हणून मा. श्री नागेश पडघान, मुख्याध्यापक कै. लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा शिवनी आरमाळ ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा यांच्या नियोजनाखाली हा तालुकास्तरीय मेळावा संपन्न झाला याप्रसंगी मा. श्री मुळे सर केंद्रप्रमुख अंढेरा  सरपंच, उपसरपंच पदाधिकारी तसेच ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते वसंतराव नाईक विजाभज विकास महामंडळ मर्या. बुलढाणा श्री हर्षल जाधव, सागर सर,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्तआणि विकास महामंडळ मर्या.बुलढाणा श्री दीपक उंबरकर, जिल्हा जात पडताळणी विभाग बुलढाणा श्री मंगेश जाधव,श्री प्रदीप शेळके इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे श्री जयेश जाधव,श्री उदय मोहळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 तसेच आनंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव मही अंतर्गत येणाऱ्या सर्व युनिटचे मुख्याध्यापक व प्राचार्य तसेच शिक्षक व सर्व कर्मचारी उपस्थित राहून मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य केले

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य श्री.ज्ञानेश्वर आरमाळ यांनी केले व प्रास्ताविक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. नागेश पडघान यांनी केले व इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासना मार्फत राबविल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी योजनांबाबतची माहिती चे पीपीटी प्रेझेंटेशन श्री. सदानंद मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. जायभाये यांनी केले व सदर तालुकास्तरीय मेळावा यशस्वी यशस्वीरित्या पार पाडला

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये