Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्कोहोलिक ॲनॉनिमसचे गडचांदुर येथे सुरू असलेले कार्य खुपचं प्रशंसनीय – डॉ. प्रवीण येरमे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्कोहोलिक ॲनॉनिमसचाच भाग असलेल्या ज्ञान समुहाचा 3 रा वर्धापण दीन सोहळा व जनजागृती कार्यक्रम 12 ऑगस्ट रोज सोमवारला मा. श्री डॉ. प्रवीण येरमे ,वैधकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय गडचांदुर, व डॉक्टर तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. श्रीनिवास सोनटक्के, या प्रमुख पाहुण्यांच्या तसेच सन्माननीय नागरीक यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा झाला, यावेळी मा.डॉ. प्रवीण येरमे यांनी अल्कोहोलिक ॲनॉनिमसचे गडचांदुर येथे सुरू असलेले कार्य खुपचं प्रशंसनीय आहे व हे काम असेच निरंतर सुरू असावे जेणेकरुन मद्यपी (दारुड्या) व्यक्ती बद्दल समाजा मध्ये एका प्रकारे झालेली बदनामी थांबेल व त्यांच्या विषयी प्रेम व करुणा निर्माण होण्यास मदत होईल असे गौरव उदगार त्यानी व्यासपीठावरून बोलुन ज्ञान समुहाच्या सभासदांना नवी प्रेरणा दिली व दारुड्या व्यक्ती वर लागलेला दारुड्या, बेवडा, असा सामाजिक कलंक हा त्यांना अल्कोहोलिक्स अनानिमसच्या माध्यमातुन पुसुन काढता येईल अशी भावना मा. डॉ. श्रीनिवास सोनटक्के यांनी व्यक्त केली.

           अल्कोहोलीक अनानिमस म्हणजे अनामिक मद्यपी ही जगभर पसरलेली संस्था आहे, ही संस्था ज्यांची दारू पिणे ही समस्या बनली आहे व ज्यांना दारू सोडण्याची इच्छा आहे पण जमत नाही अशा पिडीत व्यक्तीला विनामुल्य मदत करते हे विशेष. या संस्थेद्वारे कुठलीही वर्गणी किंवा फी आकारली जात नाही. या संस्थेमुळे बरे झालेले अनेक सभासद आज आपले कौटुंबिक व सामाजिक जीवन सुखी व आनंदाने जगत आहे. या संस्थेची नियमीत सभा सोमवार व गुरुवारला सायंकाळी 7 ते 8 या दरम्यान सावित्री बाई फुले महाविद्यालय गडचांदुर येथे असते, तरी सर्व मद्यपीडित व त्यांच्या कुटुंबीयांनी या सभेचा लाभ घ्यावा व निर्व्यसनी आयुष्य जगावे असे आव्हाहन ज्ञान समुहाच्या सर्व सभासदांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये