ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील बस स्थानक परिसरातील शौचालयात महिलेवर अत्याचार करून व्हिडिओ चित्रीकरण प्रसारित करण्यात आल्याने पाच आरोपींना ताब्यात घेऊन अप क्रमांक २६२/२४ अन्वये भारतीय दंड संहिता कलम,७०(१),६४,२,(क),(२),८७,१२६,(२)३(५) सह कलम ६७(अ) उप विभागीय पोलिस अधिकारी तपास करीत आहे.
आरोपीचा तपास करण्यासाठी अजुन काही तपास करण्यासाठी उप विभागीय पोलिस अधिकारी यांनी मा. तालुका न्याय दंडाधिकारी यांना अधिकचा तपास करण्यासाठी वेळ लागणार असल्याने मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली असून मा न्यायालयाने दोन दिवसाची मुदत वाढवून दिली आहे यामुळे आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे साहेब करीत आहे.