ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न ; 442 प्रकरण निकाली

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथील सभागृहात संपन्न झाली. सदर योजनेतील माहे जुलै-ऑगस्ट चे सुमारे 367 लाभार्थ्यांची प्रकरण मंजूर करण्यात आली तर 75 प्रकरण त्रुटी पूर्ततेसाठी अर्जदारां कडे परत पाठवण्यात आल्यात. अपंग, निराधार, विधवा, परित्यगता, अविवाहित, दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण, वृद्ध आदी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. सदर लाभार्थ्यांना तात्काळ या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुढील कार्यवाही केली जात आहे.

याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री समीर केने, सचिव नायब तहसीलदार श्री महेंद्र फुलझले, श्री अजय मल्लेलवार,समिति सदस्य श्री मल्लेश कोडारी, श्री सतीश कनकम, श्री किशोर मोहुर्ले, श्री रमेश पिपरे, श्री. अनिल मोरे, श्री. रूमदेव देरकरश्रीमती लीना कुसराम यांच्या तसेच इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये