Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य सल्लागार पदी प्रा. नीता खोत यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य सल्लागार पदी प्रा. नीता खोत यांची निवड महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले बारामती (पुणे ), राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई यांनी राज्य कार्यकारीणी सभेत जाहीर केली.

      प्रा. नीता खोत जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघद्वारा माय मराठी सरोसती (नागपूर शहर) च्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी गेल्या पाच वर्षात मराठी विषय शिक्षकांना संघटित करून अध्यापनात येणाऱ्या अडचणीवर तसेच विविध विषयांवर तोडगा काढण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राज्य सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. सोमलवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रामदास पेठ,नागपूर येथे त्या मराठी विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या

        कोरोना काळापासून तर आजतागायत बारावी च्या विद्यार्थ्यांना मराठी विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणे,जिल्हास्तरावर विविध स्पर्धा ,उपक्रम राबविणे, विविध स्पर्धांचे परिक्षक आणि प्रशिक्षक, मार्ग दर्शक म्हणून त्यांची ख्याती आहे. शिक्षक संघटनामध्ये त्या नेहमी सक्रिय असून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी तत्परतेने धावून जातात.

 मराठी भाषा विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी, भाषाविषयक उपक्रमांचे संवर्धन करणे, जिल्हास्तरावर विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविणे, तसेच कनिष्ठ माध्यमिक स्तरावर मराठी भाषा विषय सक्तीचा व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील असणे अशा विविध उपक्रमांमध्ये त्या नेहमीच सहभागी असतात.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये