Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार अमर काळे यांचा नागरी सत्कार

वर्धा जिल्हा व्यापारी संघटना व विविध सामाजिक संघटनेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या यात वर्धा जिल्ह्याला नवनियुक्त खासदार अमर काळे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांचा सन्मान वर्धेतील व्यापारी संघटना व सर्व सामाजिक संघटनाच्या वतीने स्थानिक सार्वजनिक वाचनालय येथे करण्यात येणार आहे.

या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश देशमुख उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रणजित कांबळे यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून मनी डॉ. विभा गुप्ता, सुरेश जयस्वाल, शालीकग्राम टिबडीवाल, श्रीकांत राठी उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमात वर्धेतील सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्व व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांनी तसेच वर्धेकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक डॉ.अभ्युदय मेघे तसेच सर्व सदस्य वर्धा जिल्हा व्यापारी संघटना व विवीध सामजिक संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये