ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवराव पारखी यांचा सेवानिवृत्ती सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना चे वरिष्ठ लिपिक देवराव पारखी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्य त्यांचा शाल व श्रीफळ देऊन पत्नी कमला देवराव पारखी सह सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, उपसभापती वंदना बल्की, सचिव कवडू देरकर, संचालक गणेश गोडे, पुंडलिक गिरसावळे, विनोद नवले, ज्ञानेश्वर आवारी, इरफान शेख, भालचंद्र बोडखे, सुनील बावणे, निशिकांत सोनकांबळे, विकास दिवे, उत्तम कराळे, एजाज शेख, दत्तात्रय कांबळे, राजीव ढवळे, नामदेव जुमनाके, विठाबाई देवालकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी पारखी यांच्या बाजार समितीतील सेवा काळातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी वृद उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये