ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोग्य विभागातर्फे डॉ. कुलभूषण मोरे आयुषमान भारत निक्षय मित्र ने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सार्वजनिक आरोग्य विभाग केंद्रीय मंत्रालय भारत सरकार द्वारा आयुष्यमान भारत या आरोग्य योजने अंतर्गत आयुषमान भव या आरोग्य योजनेचे उदघाटन राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले आणि या प्रसंगी विडिओ कोन्फेरेंस द्वारा सर्व आरोग्य संस्थाना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय गडचान्दुर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ गायकवाड यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक अर्थ फाउंडेशनचे संचालक डॉ. कुलभूषण हरिभाऊ मोरे यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालय द्वारा क्षयरोग मुक्त भारत अभियान मधे अर्थ फाउंडेशन च्या माध्यमातून आरोग्य विभागाला सहकार्य केल्याबद्दल आयुष्मान भारत निक्षय मित्र सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा किनाके,गाठे, भगत, बरडे,सहारे , आरोग्य कर्मचारी,उपस्थित होते.

डॉ. कुलभूषण हरिभाऊ मोरे यांनी अर्थ फाउंडेशन च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात जिवती व कोरपणा या तालुक्यात दुर्गम आदिवासी भागात निस्वार्थ आरोग्य सेवेमध्ये विविध आरोग्य शिबिर द्वारे मोफत औषधोपचार तसेच क्षयरोग व इतर संसर्गजन्य आजाराबद्दल जनजागृती करत आहेत. सखी स्वराज्य अभियान अंतर्गत महिलांच्या मासिक पाळी मध्ये जनजागृती कार्यक्रम राबविला आहे.कापडी सॅनिटरी नॅपकिन प्रोजेक्ट द्वारा सॅनिटरी नॅपकिन वितरण व महिलांच्या आरोग्याबद्दल महिलांना जागृत करण्यात येते तसेच विविध आरोग्य शिबिर द्वारे हजारो रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले आहेत यामध्ये मोफत मोतीबिंदू शिबिर मोफत बालरोग शिबिर मोफत स्त्रीरोग शिबिर मोफत जनरल तपासणी शिबिर आयोजित केले आहेत त्याचप्रमाणे तालुक्यातील कुपोषित बालकांना मोफत आरोग्य तपासणी करून आहार पोषण वाटप केलेले आहेत.

कोरोना काळात डॉ कुलभूषण मोरे यांनी अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना पासून बचाव करण्याकरिता हजारो कापडी मास्क मोफत वाटप केले होते तसेच कोरोना बद्दल जनजागृती कार्यक्रम ही राबविला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये