ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राम नामाच्या जयघोषाने शहर दुमदुमले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- शहरात श्रीराम नवमीचा जल्लोष पहायला मिळला. शहरातील विविध भागातील मंदिरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. तर श्रीराम नवमी उत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहर भगवामय झाले होते. रॅलीत एकही नारा एकही नाम… जय श्रीराम, जय श्रीराम.. यासह विविध श्रीराम गीतांच्या तालावर तरुणाई थिरकली. राम नामाच्या जयघोषाने शहर दुमदुमले होते.

      शहरात सियावर रामचंद्र की जय…’, जय सीता राम सीता… असा जयघोष करत मिरवणुका, आरती, महाअभिषेक, महाप्रसाद वाटपासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शहरातील विश्व हिंदू परिषद तर्फे शिव नगर येथून रॅली काढण्यात आली. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसह श्रीराम, सिता, लक्ष्मण यांचा सजीव देखाव्याचा रॅलीत समावेश होता. तरुणांनी भगवे ध्वज हाती घेतले होते. जय श्रीराम.. चा जयघोष करीत ही रॅली मार्गस्थ झाली. कादरिया मस्जिद चौक, न्यू कॉलनी रोड, पंडित दीनदयाळ वार्ड येथून पुढे जात मौलाना आझाद वार्ड, कारवा रोड, बुध्द नगर वार्ड, जूना बस स्टँड, रेल्वे चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, गोल पुलीया होऊन गांधी पुतळा जवळ समाप्त झाली. तर दुसरी रॅली साईबाबा मंदिर साईबाबा वॉर्ड येथून मार्गस्थ झाली.

ती मुख्य मार्गाने जूना बस स्टँड, रेल्वे चौक, नवीन बस स्टँड ने पुढे जात फुटली दिवाल काटा गेट येथून परत साईबाबा वार्ड येथे विसर्जित झाली. या रॅली मध्ये भजन कीर्तन, भारत माता ची प्रकृती, राम, लक्ष्मण, भरत यांचा देखावा, तसेच राम जन्मला गं सखे, राम जन्मला… असा पाळणा म्हणत रॅली मार्गस्थ होती. यावेळी शंखनाद करून पारंपरिक वाद्यांच्या गजराने परिसर दुमले. देवाचे महावस्त्र व पारंपरिक आभूषणे परिधान करण्यात आली. श्रीरामजन्माच्या कीर्तनासह भजन झाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये