ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थिर सर्वेक्षण पथकाकडून समृध्दी महामार्गावर कारमधून 2 लाख रुपयाची रोकड पकडली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 निवडणूक काळात आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी सह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यात काही गैर कायदेशीर बाबी आढळल्यास किंवा रक्कम आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

निवडणूक काळात कुठलाही गैर कारभार होऊ नये, मतदारावर चुकीच्या पद्धतीने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होऊ नये, गैर कृत्यांना आळा बसावा तथा निवडणुका या निकोप,भयमुक्त,पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकांची भूमिका महत्वाची ठरते.

 दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास दुसर बीड येथील समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजी नगर एक्झिट पॉईंट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून एकूण दोन लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली. मुंबई वरून येणारी इनोव्हा या गाडीमध्ये ही रोकड रक्कम पथक प्रमुख श्री. योगेश कांबळे, सहायक श्री. राजेंद्र गहिरराव, पोलीस शिपाई श्री. मांटे, फोटोग्राफर श्री. सरडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही करण्यात आली.

मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली एस एस टी पथकाचे नोडल अधिकारी श्री. डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी पुढील कार्यवाही पूर्ण केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये