ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आमदार किशोर जोरगेवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार
नागरिकांना मोठ्या संख्येने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे केले आवाहन
चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांनी सकाळी १० वाजता पटेल हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जात मतदान केले. यावेळी त्यांच्या मात्रोश्री गंगूबाई ऊर्फ अम्मा जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, रंजना जोरगेवार, यांची उपस्थिती होती.
देशाच्या सर्वात मोठ्या उत्सवात मतदार नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नागरिकांनी बाहेर निघावे अशी विनंती यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.