ताज्या घडामोडी

हिंसक घटना टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांवर बंदोबस्त ठेवण्याचे आदेश

कावेरी जलविवादाचे पडसाद उमटण्याची शक्यता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर बल्लारपूर

कावेरी नदी चे पाणी तमिलनाडूला दिले जात असल्या कारणावरून नवी दिल्ली येथे आंदोलन करण्यासाठी नॅशनल साउथ इंडियन रिवर इंटरलॉकिंग असोसिएशन, तामिळनाडू चे अध्यक्ष अय्याकन्नू हे आपल्या 144 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत (ज्यात 15 महिला आहे) ट्रेन नंबर 12615 जीटी एक्सप्रेस दिल्लीला जात होते. त्यांना दिल्लीला न जाऊ देता मध्य प्रदेश मधील नर्मदापुरम रेल्वे स्टेशनवर RPF, GRP व स्थानिक पोलीस 400 कर्मचाऱ्यामार्फत ट्रेन मधून उतरून देण्यात आले आहे. तसेच त्यांना ट्रेन क्र. 16032 अंदमान एक्सप्रेसला 1 अतिरिक्त कोच जोडून चेन्नई ला नेण्यात येत आहे.

सदर ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर RPF व GRP त्यांच्यासोबत तैनात आहे. तरीपण त्यांना जबरदस्तीने चेन्नईला नेण्यात येत असल्याने ते हिंसक प्रदर्शन करू शकतात. त्यामुळे आपल्या पोस्टे मधील हद्दीतील रेल्वे स्टेशनवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सदर ट्रेन वर जास्तीत जास्त बंदोबस्त ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये