अवैधरित्या मजा तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांना अटक
लाखोंचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंदी आहे. मात्र नव-नवी शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक होत असते. आशा छुप्या कारवाईवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवली जाते. अशाच एका छुप्या कारवाईचा कोरपना पोलिसांनी भंडाफोड केला आहे. कोरपना पोलीस स्टेशनच्या द्दीतील येत असलेल्या पारडी ते वनसडी पर्यंत महिंद्रा पिकप मध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू घेवून जात असल्याची गुप्त माहिती एस. डी. पी. ओ जाधव यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये एकूण 7 लाख 49 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये मजा 160 डब्बे तर हुक्का तंबाखू 108 असे जप्त करण्यात आले आहे मालाची एकूण 1लाख 49 हजार 600 एकढी असून महिंद्रा पिकप ची किंमत 6 लाख आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालक अन्य एक अशा दोन व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गायकवाड, ए. एस. आय राठोड, पो. शि. लखन, पो. शि. मडावी, पो. शि. विक्रम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.