ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चारचाकी वाहनातून अंमली पदार्थाची तस्करी

चारचाकी वाहन असा एकूण 6 लाख 52 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन पो. स्टे. सिंदी (रेल्वे) हद्दीत NDPS ACT 1985 अन्वये रेड करून आरोपीतांचे ताब्यातुन MD (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ, 5 मोबाईल व चारचाकी वाहन असा एकूण जु. किं. 6,52,880/- रु. चा मुद्देमाल जप्त केला

 दिनांक 28/07/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा NDPS पथक वर्धा विभाग पथक व हिंगणघाट विभाग अशी 03 पथके पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करने करिता पेट्रोलिंग करित असतांना मुखबिरद्वारे गोपनीय माहिती मिळाली की, नागपूर वरून वर्धा कडे चारचाकी वाहन क्र MH 04 FZ 2880 या वाहनाने MD (*मॅफेड्रॉन ) अंमली पदार्थ ची वाहतूक करून घेऊन येत आहे. अशा माहिती वरून पो. स्टे. सिंदी (रे.) हद्दीत सेलडोह बॉर्डर जवळील प्लास्टिक खुर्ची फॅक्टरी जवळ नाकाबंदी करून आरोपी नामे 1) दर्शन हरिभाऊ फुंडे, वय 24 वर्ष, रा. गणेश नगर, बोरगाव मेघे, वर्धा

2) अनिस मुकिंदराव डोंगरे, वय 29 वर्ष, रा. स्टेशनफैल दयाल नगर, वर्धा

3) अनिकेत उर्फ अनुप शंकर ढाले, वय 25 वर्ष, गणेश नगर, बोरगाव मेघे, वर्धा

4) वेदांत मंगेश भराडे, वय 18 वर्ष, रा. गणेश नगर बोरगाव मेघे, वर्धा यांना चारचाकी कार क्रमांक MH 04 FZ 2880 सह ताब्यात घेऊन यांच्या ताब्यातून जप्त माल वर्णन :-1) 8 ग्रॅम 22 मिलिग्रँम वजनाची MD (मॅफेड्रॉन) किंमत 32,880/-₹. 2) एकूण पाच अँड्रॉइड व आयफोन मोबाईल किंमत 1,20,000/- रू3) हुंडाई वर्णा कंपनीची कार जिचा क्रमांक MH 04 FZ 2880 किंमत 5,00,000/-असा जु. किंमत 6,52,880/- रुपये चा मुद्देमाल मिळून आल्याने शासकीय पंचांसमक्ष जप्त करण्यात आला, आरोपी क्रमांक 01 ते 04 यांना MD ( मॅफेड्रॉन) कुठून आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी नागपूर येथून आणल्याचे सांगितल्याने आरोपीतां विरुद्ध पोलीस स्टेशन सिंदी (रे) येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन सिंदी (रेल्वे) हे करीत आहे.

सदर कारवाई मा. श्री. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि सलाम कुरेशी, पो.हवा. हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, महादेव सानप, ना.पो.कॉ. रामकीसन इप्पर, प्रदीप वाघ, पोलीस अंमलदार अरविंद इंगोले, अक्षय राऊत, अखिल इंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये