कोरपना व जिवती तालुक्यात दिनांक ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ पासुन कुष्ठरुग्णशोध मोहीम राबविणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतीथीचे औचित्याने ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तालुका कोरपना व जिवती स्पर्श अभियान अंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम व कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविणार आहे.
कुष्ठरोग आजारात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात जास्त कुष्ठरुग्ण निघणारा जिल्हा आहे. सदर आजाराचे निमुर्लन करण्यासाठी संशयीत रुग्ण शोधून त्यांना लवकरात लवकर उपचाराखाली आणणे. तसेच या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत स्पर्श अभियान व कुष्ठरुग्ण शोध मोहीम कोरपना व जिवती तालुक्यात राबविण्यात येत आहे.
यात तालुक्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कुष्ठरोग आजारावरील म्हणी, कुष्ठरोग प्रतिज्ञा, घोषवाक्य, गावागावात गटचर्चा, ग्रामसभा, कुष्ठरोग प्रदर्शनी आदी प्रकारे जनजागृतीपर कार्यक्रम तसेच कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे तालुक्यातील गावामध्ये आशाताई व स्वयंसेवक मार्फत सर्व लोकांची तपासणी होणार आहे त्यांना सर्व लोकांनी सहकार्य करावे व आपली व आपल्या परिवाराची तपासणी करून घ्यावी . “कलंक कुष्ठरोगाचा मिटवू या, सन्मानाने स्विकार करूया” या घोषवाक्याने सुरवात करुन सदर मोहीम राबवायची आहे. कोरपणा व जिवती तालुक्यातील मा. संवर्ग विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही तालुक्यांची वेगवेगळी समन्वय समितीची बैठक पार पडली.
सदर मोहीम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली .तसेच डॉ संदीप गेडाम सर सहाय्यक संचालक कुष्ठरोग चंद्रपूर यांनी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे सर तसेच कोरपना व जिवती तालुक्याचे आरोग्य सहाय्यक श्री दिनेश मोरे, कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री सतीश पांढरे तालुका कोरपना, कुष्ठरोग तंत्रज्ञ कु विना आंबटकर तालुका जिवती यांनी सदर मोहीम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी कोरपना व जिवती तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली . तदनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहाय्यक आणि आशा वर्कर व स्वयंसेवकांची तसेच पर्यवेक्षकांची कार्यशाळा घेतली. अंबुजा फाउंडेशन उपरवाही, अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स आवळपूर, दालमिया फाउंडेशन नाराडा यांच्या सीएसआर निधी मधून सदर आजाराचे बॅनर छापण्यात सहकार्य लाभले.
शरीरावर संवेदनरहीत लालसर फिकट रंगाचा चटटा आढळून आलेला व्यक्ती हा कुष्ठरोग संशयीत असू शकतो. अशा व्यक्तीने कुष्ठरोग निदानासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात नजिकच्या आरोग्य उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घ्यावी. लवकर निदान लवकर उपचार केल्यास होणारी विकृती टाळता येवू शकतात. तसेच हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होतो. अंगावर पाच पेक्षा कमी चटटे असल्यास सहा महिन्यापर्यंत उपचार घ्यावे लागतात, तर पाच पेक्षा जास्त चटटे असल्यास बारा महिन्यापर्यंत उपचार घेणे आवश्यक आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अंधश्रध्देला बळी पडल्यास शरीरीक अंपगत्व येवू शकते. सदर लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी व निदान करून घ्यावी असे-*कोरपना व जिवती तालुक्यात दिनांक ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ पासुन कुष्ठरुग्णशोध मोहीम*
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतीथीचे औचित्याने ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तालुका कोरपना व जिवती स्पर्श अभियान अंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम व कुष्ठरुग्ण शोध मोहीम
कुष्ठरोग आजारात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात जास्त कुष्ठरुग्ण निघणारा जिल्हा आहे. सदर आजाराचे निमुर्लन करण्यासाठी संशयीत रुग्ण शोधून त्यांना लवकरात लवकर उपचाराखाली आणणे. तसेच या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी ३१ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत स्पर्श अभियान व कुष्ठरुग्ण शोध मोहीम कोरपना व जिवती तालुक्यात राबविण्यात येत आहे.
यात तालुक्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कुष्ठरोग आजारावरील म्हणी, कुष्ठरोग प्रतिज्ञा, घोषवाक्य, गावागावात गटचर्चा, ग्रामसभा, कुष्ठरोग प्रदर्शनी आदी प्रकारे जनजागृतीपर कार्यक्रम तसेच कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे तालुक्यातील गावामध्ये आशाताई व स्वयंसेवक मार्फत सर्व लोकांची तपासणी होणार आहे त्यांना सर्व लोकांनी सहकार्य करावे व आपली व आपल्या परिवाराची तपासणी करून घ्यावी . “कलंक कुष्ठरोगाचा मिटवू या, सन्मानाने स्विकार करूया” या घोषवाक्याने सुरवात करुन सदर मोहीम राबवायची आहे. कोरपणा व जिवती तालुक्यातील मा. संवर्ग विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही तालुक्यांची वेगवेगळी समन्वय समितीची बैठक पार पडली.
सदर मोहीम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली .तसेच डॉ संदीप गेडाम सर सहाय्यक संचालक कुष्ठरोग चंद्रपूर यांनी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे सर तसेच कोरपना व जिवती तालुक्याचे आरोग्य सहाय्यक श्री दिनेश मोरे, कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री सतीश पांढरे तालुका कोरपना, कुष्ठरोग तंत्रज्ञ कु विना आंबटकर तालुका जिवती यांनी सदर मोहीम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी कोरपना व जिवती तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली . तदनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सहाय्यक आणि आशा वर्कर व स्वयंसेवकांची तसेच पर्यवेक्षकांची कार्यशाळा घेतली. अंबुजा फाउंडेशन उपरवाही, अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स आवळपूर, दालमिया फाउंडेशन नाराडा यांच्या सीएसआर निधी मधून सदर आजाराचे बॅनर छापण्यात सहकार्य लाभले.
शरीरावर संवेदनरहीत लालसर फिकट रंगाचा चटटा आढळून आलेला व्यक्ती हा कुष्ठरोग संशयीत असू शकतो. अशा व्यक्तीने कुष्ठरोग निदानासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात नजिकच्या आरोग्य उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घ्यावी. लवकर निदान लवकर उपचार केल्यास होणारी विकृती टाळता येवू शकतात. तसेच हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होतो. अंगावर पाच पेक्षा कमी चटटे असल्यास सहा महिन्यापर्यंत उपचार घ्यावे लागतात, तर पाच पेक्षा जास्त चटटे असल्यास बारा महिन्यापर्यंत उपचार घेणे आवश्यक आहे.
या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अंधश्रध्देला बळी पडल्यास शरीरीक अंपगत्व येवू शकते. सदर लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी व निदान करून घ्यावी-असे आवाहन डॉ. स्वप्नील टेंभे तालुका आरोग्य अधिकारी तालुका कोरपना / जिवती यांनी केले आहे.