Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकीने विदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीच्या ताब्यातून 1 लाख 40 हजारांवर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 23.07.2024 रोजी सायंकाळी उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी स्टेशन फैल वर्धा येथे पंच व पोलीस स्टॉफ चे मदतीने आरोपी नामे गौरव राजेश कैथवास वय 22 वर्ष रा. स्टेशनफैल वर्धा याचे यांचेवर प्रोव्हीशन रेड केला असता त्यांचे ताब्यातुन १) एक सिल्वर रंगाची सुजीकी कपंनीचे बर्गमॅन दुचाकी वाहन क्र एम.एच 32 ए.डब्लु. 7716 2) एका अर्ध्या खरठ्याचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 24 सिलबंद शिश्या, 3) एका अर्ध्या खरर्डयाचे खोक्या मध्ये 180 एम.एल.च्या ऑफीसर चाईस ब्लु कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला 24 सिलबंद शिश्या 4) 500 एम.एल.च्या कॉसबर्ग कंपनीच्या बियर दारूने भरलेला 24 सिलबंद टिन कॅन असा एकुन जु. की 140400/- रु चा माल बिनापास परवाना अवैधरित्य वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीविरुध्द १) अपराध क्रमांक 1174/2024 कलम 65 अई. 77 अ. म.दा.का. सहकलम 3 (1) 181, 130/177 मो.वा.का अन्वये नोद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे.वर्षा शहर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खाँन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.शि. मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये