अवैध होर्डीग वरील कार्यवाही सामान्य जनतेचा मुत्यु झाल्यावरच होणार काय?
भिम आर्मीचे मुख्याधिकारी यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मुंबई येथील विशाल होडीग पडून 14 लोकांचा मुत्यु होऊन,40 ते 45 लोक अत्यंत गंभीर पणे जख्मी झाले होते.त्याचा निषेध म्हणून सम्पूर्ण महाराष्ट्र भर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी निषेध केला. वर्धा जिल्ह्यातही राजकीय पक्षाच्या, सामाजिक संघटना च्या वतीने निवेदन तक्रार दिल्या होत्या,
परंतु त्याना नंतर प्रशासनाणे तत्पर कार्यवाहीस लागली,परंतु ही कार्यवाही काही दिवस करण्यात आली असून पुढील कार्यवाही का थाबली आता कार्यवाही ची सुरुवात कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे? पुढील कार्यवाही सामान्य जनतेचा जीव गेल्यावर होणार काय ? सामान्य जनतेचा जीव येवढा स्वस्त झाला काय ? असा प्रश्न भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे विदर्भ अध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी मुख्याधिकारी नगर परिषद वर्धा मा. राजेश भगत साहेब यांना केला.
कार्यवाहीला त्वरित गति देत पुढील अवैध होडीग वर कार्यवाही ला सुरुवात करण्यात यावी,आता पर्यत केलेल्या कार्यवाही चा अहवाल त्वरित सादर करावा,संबंधित अवैध होडीग लावण्याऱ्या कंपनी, संस्था,व्यक्ती वर गुन्हा दाखल करण्यात यावा,अन्यथा अवैध होडीग मुळे पुन्हा एखाद्या सामान्य जनतेचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी संबंधित नगरपरिषद अधिकारी याच्यावर राहून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे निवेदन भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे विदर्भ अध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी दिले,तेव्हा बंटी रंगारी,कमलेश उमरे,राहुल वानखेडे,अंकुश भोयर, वैभव नाखले, आकाश उमरे,इत्यादी उपस्थित होते.