ताज्या घडामोडी

गोळीबारात युवकाचा जागीच मृत्यु – महाराष्ट्र बँकेसमोर थरार

मृत युवकाच्या भावाने वर्षभरापूर्वी केला होता गोळीबार - हल्लेखोर फरार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असुन पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. चंद्रपूर व बल्लारपूर येथिल गोळीबाराच्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच राजुरा येथेही झालेल्या गोळीबाराने शहर हादरले असुन सदर हल्ल्यात एका युवकाचा जागीच मृत्यु झाला आहे तर गोळीबार करणारे दोन हल्लेखोर पळुन जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

प्राप्त माहितीनुसार नुसार राजुरा येथिल असिफाबाद मार्गावरील महाराष्ट्र बँकेच्या समोरील ओम जनरल स्टोअर्स च्या परिसरात हा गोळीबार झाला. मिळालेल्या माहितीप्रमाणे मृतक शिवज्योत सिंह देओल हा युवक पंचायत समिती चौकाकडे दुचाकीने येत असताना त्याच्या मागावर असलेल्या दुचाकी स्वरांनी त्याच्यावर गोळी झाडली मात्र नेम चुकल्याने तो बचावला. त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्या दुचाकीला पाडले मात्र शीवज्योत जीव वाचविण्यासाठी शिताफीने ओम जनरल स्टोअर्स मधे शिरला.

दरम्यान हल्लेखोरही त्याच्या मागे धावत गेल्याने तो दुकानाच्या मागच्या अंगणात गेला आणि तिथेच हल्लेखोरांनी डाव साधत त्याच्यावर गोळीबार करून त्याची जागीच हत्या केली.

मृतक शिवज्योत सिंह देओल ह्यांच्या भावाने बरोबर वर्षभरापूर्वी लल्ली नामक इसमावर केलेल्या गोळीबारात राजुरा येथिल भाजपा नेते सचिन डोहे ह्यांच्या पत्नी पुर्वशा ह्यांचा मृत्यु झाला होता हे विशेष.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये