Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी, विदेशी, दारुचा एकूण 6 लाख 58 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 23/07/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अँटी गँग सेल पथक व हिंगणघाट विभाग पथक असे पो स्टे वर्धा व राम नगर परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून इंदिरा नगर येथे राहणारा बादल धवणे हा त्याचे साथीदारासह त्याचे ताब्यातील ग्रे रंगाची swift गाडी क्रमांक एम एच 02 सी एच 9783 ने लिओ पोर्ट बार नागपुर येथून पवनार मार्गने त्याचे राहते घरी देशी विदेशी दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून रोड आणि चौक रोडवर नाकीबंदी करून त्यांचेवर घेराव टाकुन प्रो रेड केला असता 1) बादल दिवाकर धवणे, वय 29 वर्ष, 2) आकाश राजेश तांबेकर, वय 28 वर्षे, 3) लोभेश मनोहर घुगरे वय 23 वर्ष, रा सर्व इंदिरा नगर, आर्वीनाका, वर्धा 4) लिओ पोर्ट 9 बार मालक व चालक रा. नागपूर (पसार)5) लिओ पोर्ट 9 बार चा नौकर बार सतिश उर्फ माटे गणपत हजारे रा नागपूर (पसार) यांचे ताब्यात जप्त माल वर्णन :-1) 02 खर्ड्याच्या खोक्यात आफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 96 सिलबंद शिश्या ज्याचा बेंच न 168/24 दिनांक 15/07/24 प्रतीनग 350 रु. प्रमागणे 33,600 रु 2) 02 एका खर्डाच्या खोक्यात oc कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 96 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 160/24 दिनाक 08/07/24 प्रतीनग 300 रु. प्रमाणे 28,800 रु3) 02 खर्डाच्या खोक्यात RS कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 96 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 1041 दिनाक 12/07/24 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 33,600 रु 4) 03 खर्डाच्या खोक्यात देशी कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम.एल च्या 300 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं R V 294 दिनाक 07/24 प्रतीनग 100 रु. प्रमाणे 30,000 रु5) एका खर्डाच्या खोक्यात tubrg कंपनीच्या विदेशी बिअर दारूने भरलेल्या 500 एम.एल च्या 10 सिलबंद टिन डब्बा ज्याचा बॅच नं 423 दिनाक 16/07/24 प्रतीनग 300 रु. प्रमाणे 3,000 रु6) एक ग्रे रंगाची swift कार क्रमांक एमएच 02 सी एच 9783 चारकाची गाडी किमत 5,00,000 रू  7) 02 अँड्राईड मोबाईल किमत 29,000/- रु.असा एकुण जु.कि. 6,58,000/- चा मुद्देमाल जप्त करून आरोपी बादल याला जप्त दारुबाबत विचारणा केली असता त्याने स्वतः चे कारने जिल्हा नागपुर येथे जाऊन 4) लिओ पोर्ट 9 बार मालक व चालक रा. नागपूर (पसार) याचेशी संपर्क करून दारुमाल बार मधील नौकार आरोपी 5) लिओ पोर्ट 9 बार चा नौकर बार सतिश उर्फ माटे गणपत हजारे रा नागपूर पसार याने काढून दिला अशी माहिती दिली. सदर आरोपीतांविरुध्द पो स्टे सेवाग्राम येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

 सदर कारवाई मा. श्री. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, यशवंत गोल्हर, महादेव सानप, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार मनीष कांबळे,गोपाल बावनकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये