ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे लिंगनडोह येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे सभोवतालील गावांच्या विकासा कडे सतत धडपड करताना दिसत आहे, गांवातील लोकांच्या आरोग्या कडे विशेष लक्ष देत आज लिंगनडोह येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आलेत.

याशिबिरात गांवतील एकूण 40 महिला, पुरुष, वृद्ध तसेच लहान मुलांची तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर सर्व लाभार्थ्यांना योग्य तो मुबलक औषधोपचार करण्यात आला. या वेळेस सरकारी दवाखान्याचे डॉ जाधव व त्यांचे सहकारी यांची उपस्थिती होती.

तर डॉ पराग टेम्बुरडे, नेत्र तज्ञ्, चंद्रपूर यांनी एकूण 35 लोकांची नेत्र तपासणी करून त्यांच्या चष्म्याचे नंबर काढण्यात आले, पुढील हफ्त्यात त्या सर्वाना चष्मा वाटप करण्यात येणार आहेत.

 या शिबीरला यशस्वी करण्यास ग्रामपंचायत सदस्य तसेच अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, आशा वर्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या शिबिरा करिता गावकर्यांनी माणिकगढचे मनापासून आभार मानलेत.

या शिबिराला यशस्वी करण्यास सी.एस.आर. टीम माणिकगड ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये