ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बारा बलुतेदार महासंघ च्या तालुका अध्यक्ष पदी सुनील शेजुळकर यांची नियुक्ती

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देऊळगाव राजा येथील बारा बलुतेदार समाजाची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली

       त्यात प्रामुख्याने सर्वानुमते श्री सुनील शेजुळकर यांची बारा बलुतेदार संघ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर श्री गजानन रायमल कार्याध्यक्ष श्री राजेश कांबळे उपाध्यक्ष श्री सुनील काटकर सचिव श्री भारत कुऱ्हे सहसचिव श्री शांताराम भाग्यवंत कोषाध्यक्ष श्री राजेश पंडित प्रसिद्धी प्रमुख श्री झनकलाल पिंपळे संघटक श्री जयेश तोडरमल सहसंघटक श्री रघुनाथ गोरे कार्यकारिणी सदस्य श्री ज्ञानेश्वर पोपट कार्यकारिणी सदस्य श्री रामदास भोलणकर जेष्ठ मार्गदर्शक म्हणून एकमताने वरील पदाची निवड करण्यात आली.

      कार्यक्रमामध्ये बारा बलुतेदार समाजाची दशा आणी दिशा म्हणून विस्तृत अशी चर्चा करण्यात आली यासाठी श्री दामोधरजी बिडवे साहेब बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा श्री प्रा.माळी साहेब चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष बुलडाणा तथा श्री प्रकाश सुरडकर साहेब जिल्हाध्यक्ष लोहार समाज बुलडाणा बबन कुमटे सर श्री गजानन झगरे साहेब महा.राज्य आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये