ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यातील विकासकामांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

मनरेगाच्या कामाची केली पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

     सावली पंचायत समिती अंतर्गत अनेक विकास कामे झाली आहेत. या कामांच्या पाहणीसाठी स्वत: चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी भेट दिली. यात मनरेगाच्या कामाची पाहणी करुन कामाबद्दल कौतुक केले.

भेटी दरम्यान पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मुंडाळा ग्रामपंचायत व आयसीसी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 च्या आर्थिक वर्षात 11 हजार वृक्षांची लागवड करुन फळबाग फुलविली आहे. त्यात सिताफळ 5 हजार 500, करवंदाचे 4 हजार 850, आंबा 650 या फळझाडांचा समावेश आहे. सदर वृक्षलागवड वनहक्क समितीच्या 12 हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली, या लागवडीला 20 वर्षे पुर्ण झाली असुन 100 टक्के फळझाडे जिवंत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुंडाळा येथील सरपंच, सचिव, रोजगार सेवक, मजुर यांचे भरभरुन कौतुक केले तर असेच प्रत्येक ग्रामपंचातीनी मुंडाळा ग्रामपंचायतीचा आदर्श घेवून फळबागा फुलवाव्यात असा संदेश यावेळी दिला.

   सावली पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायत बोथली येथे 10 लक्ष रुपयाचे उमेद प्रभाग संघाचे बांधकाम, मेहा बुज.येथील 25 लक्ष रुपयाचे क्रिडांगण,मंगरमेंढा येथील बळीराजा समृध्दी मार्ग शेतपांदन रस्त्याचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. यासोबतच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जलजिवन मिशनच्या कामाची पाहणी करण्यात आली.घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या संदर्भात मार्गदर्शन केले व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.त्यानंतर सावली पंचायत समिती येथे सर्व विभागप्रमुखाची आढावा बैठक घेवून अनेक विकास कामासंदर्भात चर्चा केली तर सावली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर वासनिक यांचे भरभरुन कौतुक केले. या दौऱ्यादरम्यान सावलीचे तहसिलदार प्रांजली चीरडे, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक,सहा.गटविकास अधिकारी,उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, गटशिक्षणाधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,मनरेगा,उमेद व स्वच्छ भारत मिशनच्या टिम उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये