ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.अभ्युदय मेघे यांच्या मागणीला यश.

महाविद्यालयात राबवणार नवं मतदान नोंदणी कार्यक्रम.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नुकताच लोकसभा निवडणुका पार पडला. यात अनेक नागरिकांचे मतदान कार्ड नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.हीच बाब लक्षात घेत वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. डॉ.अभ्युदय मेघे यांनी दीपक कारंडे उपविभागीय अधिकारी वर्धा यांना पत्राद्वारे वर्धा शहरातील विविध महाविद्यालयात नवं मतदान नोंदणी शिबिर लावण्याची विनंती केली होती. याच विनंतीची दखल घेत उपविभागीय अधिकारी वर्धा यांनी नुकताच एक परिपत्रक काढून 22 जुलै 31 जुलै 2024 या कालावधीत वर्धा शहरातील विविध महाविद्यालयात नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन डॉ.अभ्युदय मेघे यांनी विद्यार्थांना केले आहे.

डॉ. मेघे यांनी दिलेल्या पत्राची दखल घेतल्याबद्दल उपविभागीय अधिकारी वर्धा यांची आभार देखील मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये