ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहनातून जनावरांची तस्करी ; तिघांना अटक 

३ आरोपी फरार ; ७५ जनावरांना केले मुक्त : मूल पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मंगेश पोतवार

मूल पोलिसांची कारवा मूल:कत्तलीसाठी जनावरे कोंबून नेत असल्याची गोपनीय माहिती मिळताच मूल पोलिसांनी येथील गांधी चौकात मंगळवारी पहाटे ५.३० ते ६ वाजता दरम्यान नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली,दरम्यान गडचिरोली कडून येणाऱ्या दोन वाहनातून जनावरे नेत असल्याचे आढळून आले.याप्रकरणी पोलिसांनी सैलानी खाजामिया तग्याले वय २८ वर्ष रा. दापका(गु.)ता.मुखेड जि.नांदेड,समिर नजिर शेख वय २८ वर्ष रा.गोयेगांव ता. बांगडी जि.आसिफाबाद,मुनवर खान मदर खॉन वय ४० वर्ष रा.गोयेगांव ता.वांगडी जि.आसिफाबाद या तीन आरोपींना अटक केली.तर पुसाम वासु रा.लक्कडकोट ता.राजुरा,शेख अस्लम रा.गौरी जि.आसिफाबाद,मोहीन खॉन रा.गोयेगांव ता. वांगडी जि.आसिफाबाद हे फरार आहेत.

गडचिरोली वरून मूल मार्गाने दोन ट्रक मधून परप्रांतात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मूल पोलिसांना मिळाली.पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्या नेतृत्वात एक टीम तयार करून नाकेबंदी केली.दरम्यान गडचिरोली कडून एम.एच – ४० बी. एल ६७२१ असलेला टाटा कंपनीचा व ए.पी.- २९ यु ९३२६ या दोन वाहनांची तपासणी केली असता वाहनातून ७५ गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले.

तीन आरोपींना अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत.जनावरांना चंद्रपूर दाताळा रोड वरील प्यार फाऊंडेशन येथे सोडण्यात आले आहे.पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये