कोरपना येथे भव्य महिला भारुड भजन स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :- श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित भव्य महिला भारुड भजन स्पर्धा व शोभायात्रा श्री संत गजानन महाराज मंदिर, गजानन नगरी, कोरपना येथे शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर गिरीधर काळे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प विठ्ठल महाराज डाखरे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य संजय ठावरी, बंडू पाटील मोहितकर, अनिल रेगुंडवार, रमेश बुरेवार आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
दिनांक सात रोजी सकाळी नऊ वाजता श्रीराम मंदिर ते श्री संत गजानन महाराज मंदिर पर्यंत शोभायात्रा, सायंकाळी चार वाजता भारुड भजन स्पर्धा, रविवार दिनांक ८ रोजी सकाळी सात वाजता अभिषेक श्री साईनाथ महाराज बेला यांचे शुभ हस्ते, दुपारी बारा वाजता काल्याचे कीर्तन ह भ प भुसारी महाराज, वनसडी, दुपारी तीन वाजता श्री स्वामी चैतन्य महाराज, वढा यांचे प्रवचन व दर्शन सोहळा, दुपारी साडेतीन वाजता महाप्रसाद, सायंकाळी सात वाजता महाआरती व कार्यक्रम समारोप होणार आहे. भारुड भजन स्पर्धेसाठी दहा रोख बक्षीसे तर तीन वैयक्तिक बक्षीस राहणार आहे.
या निमित्य होणाऱ्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत गजानन महाराज मंदिर कमिटी,श्रीराम सेवा समिती व नगरवासी यांनी केले आहे.



