दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी ताब्यात
पिडीत मुलीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर याप्रमाणे आहे की यातील फिर्यादीने पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 16 वर्षे हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेले. अशा दि 04/06/2025 ला फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो. स्टे. सिंदी रेल्वे येथे अप क्र. 374/2024 कलम 137(2), BNS प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयातील पीडित मुलीचा व आरोपीचा शोध न लागल्याने गुन्हायात 143(4)BNS प्रमाणे कलम वाढ करुन सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्फतीने करीत असताना मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले.
सदर गुन्ह्यात खात्रीशीर मुखबिर लावून व तांत्रिक तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपीची व पीडित मुली बाबत संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असता आरोपी नामे प्रफुल ज्ञानेश्वर काळे वय 29 वर्षे रा. दिग्रज त. सेलु याने पिडीत अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून कामठी ,जि.नागपूर येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून नमूद आरोपीस मौजा आवंडी, कामठी, जि. नागपूर येथिल कोळसा डेपो मधुन ताब्यात घेऊन अल्पवयीन पीडित मुलीबाबत विचारपूस केली असता मुलगी त्याचे सोबत राहत असल्याचे सांगितले त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीस रीतसर कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली असून पुढील तपास पो. स्टे. सिंदी रेल्वे करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, दिवाकर परिमल, खुशालपंत राठोड, नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, पो.शि. नवनाथ मुंडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तसेच सायबर सेल येथील दिनेश बोथकर,अक्षय राऊत, गोविंद मुंडे , यांनी केली.



