देऊळगाव राजा येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन यात्रा महोत्सव सुरू
8 फेब्रुवारीला समाप्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री संत गजानन महाराज मंदिर, कुंभारी देऊळगाव राजा येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन यात्रा महोत्सव ला 1 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला असून 8 फेब्रुवारी रोजी समाप्ती होणार आहे.
या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, ह भ प भागवताचार्य महंत श्री स्वामी परमेश्वर यतीजी महाराज भागवत कथा सादर करणार आहे. तसेच ह भ प नकुल महाराज संके, आळंदी, ह भ प उद्बोध महाराज पैठणकर, देऊळगाव राजा, ह भ प भीमाशंकर गुरूजी, परभणी, ह भ पअर्जुन महाराज पळशीकर, ह भ प डॉ अनिरुद्ध महाराज क्षिरसागर, ह भ प संतोष महाराज वणवे, ह भ प बंडोपंत महाराज ढाकणे, परळी यांचे कीर्तन होणार आहे,7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे,8 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता श्री ची पालखी मिरवणूक श्री संत गजानन महाराज मंदिर येथून निघणार आहे,ह भ प निकम गुरुजी यांचे काल्याचे कीर्तन दुपारी 12 वाजता झाल्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम ने सप्ताहाची सांगता करण्यात येईल.
यात्रा महोत्सव मध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवाभावी मंडळ , कुंभारी परिसर देऊळगाव राजा यांनी केले आहे.



