ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. रिना धनपाल बागडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय परिषदेत सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदकिशोर गुद्देवार

      भारतातील सामाजिक समानता या विषयावर आधारित ७ वी राष्ट्रीय परिषद २०२४ आणि पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी भगवान गौतम बुद्धांचा बुद्ध पौर्णिमा उत्सव २०२४ आणि राजर्षी शाहू महाराजांची १५० वी जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार या विषयी प्रबोधन करण्यात आले. तसेच भारतातील सामाजिक समानता क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

          क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार २०२४ डॉ रिना धनपाल बागडे यांना श्रीमती रिंचेन लामो (राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य व बौद्ध अधिष्ट्ठाता, अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय भारत सरकार), डॉ. एस. एन. पठाण, माजी कुलगुरू रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेंशी आणि माढ्याचे खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते दिनांक २६ जून २०२४ ला दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ संजय कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत, डॉ मनीष गवई, डॉ गोरख साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ रिना बागडे यांना शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार साठी निवड करण्यात आली. डॉ रिना यांनी रा. तु. म. नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात पी. एच. डी. पदवी प्राप्त केली असून त्यांचा शैक्षणिक प्रवास हा खूप कठीण होता. वडील डॉ. आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी इथून शिपाई म्हणून सेवानिवृत्त झालेत. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी अथक प्रयत्न घेतलेत.

            मागास्वर्गीयातून मुलीने उच्च शिक्षण प्राप्त करणे म्हणजे मुलींसाठी एक प्रेरणास्थान होणे आहे. डॉ रिना ह्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत झटत असतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडविणे, करियर बद्दल विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणे, मुलींनी आत्मनिर्भर का राहावे यासाठी त्यांना प्रेरित करणे, शिक्षण आपल्या भविष्यासाठी किती महत्वपूर्ण आहे यासाठी मुलींना मार्गदर्शन करणे व त्यांना साहाय्य्य करणे. आपण जन्माला आलोत तर आपलं समाजासाठी काही देणं लागतं. डॉ रिना या त्यांच्या शैक्षणिक कार्यातून समाजासाठी सेवा देण्याचं कार्य करीत आहेत व त्या करत राहतील.

डॉ रिना यांनी आपले आई वडील व भाऊ तसेच पती श्री संचितानंद चुर्हे यांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये