ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडियन आदिवासी वीर – वीरांगणा सोहळ्याचे आयोजन

महात्मा रावण यांची निघाली भव्य शोभायात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती येथील गोंडीधर्मीय आदिवासी बहुउद्देशीय संघटनेतर्फे शहरातील नाग मंदिराजवळील जिल्हा परिषद हायस्कूल येथे विदर्भस्तरीय संपूर्ण गोंडियन आदिवासी वीर- वीरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शहरातील तहसील कार्यालया जवळील भीवसेन पेनठाणा येथून गोंड राजा महात्मा रावण यांच्या भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर,माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, गोंडीधर्मीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश मेश्राम, काँग्रेस शहराध्यक्ष सुरज गावंडे, एडवोकेट प्रमोद गेडाम, गोलू गेडाम, संदीप नैताम, संदीप कुमरे अध्यक्ष गोंडी धर्मीय बहुउद्देशीय आदिवासी संघटना आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर भव्य शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला.

सदर शोभायात्रा हायवे, बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शहरातील मुख्य रस्त्याने निघून कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली. त्यानंतर अन्य विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. यात तेलंगाना इंद्रावेलीचे सुप्रसिद्ध गायक रवी मेश्राम तथा मेघराज मेश्राम यांच्या गायनाचा, प्रबोधनात्मक कार्यक्रम, पारंपारिक गोंडी नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रमांचा सहभाग होता. सदर शोभा यात्रेत आदिवासी संस्कृतीला उजाळा देणारे विविध चित्ररथ, विविध आदिवासी नृत्य पथके, पारंपारिक वाद्य पदके तथा आदिवासी समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

सदर कार्यक्रमात विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली तथा अन्य जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान शिवसेना ऊबाठा जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे तथा गोंडी धर्मीय बहुउद्देशीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष संदिप कुमरे व मित्रपरिवार यांचे तर्फे शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना नाश्ता व सरबतचे वितरण करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये