ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैनगंगा नदीत बुडून मच्छीमाराचा दुर्दैवी मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :_ तालुक्यातील गंगापूर टोक येथील रहिवासी देवा वाघाडे यांचा वैनगंगा नदीत मासेमारी करत असताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, देवा वाघाडे हे नेहमीप्रमाणे वैनगंगा नदीवर मासेमारीसाठी गेले होते. यावेळी नदीकिनारी असताना त्यांचा अचानक तोल जाऊन ते पाण्यात पडले. पोहण्याचा प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता आले नाही आणि पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित यंत्रणेला माहिती देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गंगापूर टोक परिसरात शोककळा पसरली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये