Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील मराठा सगेसोयरेचा आदेश रद्द करण्यासाठी…

सिंनगाव जहांगीर फाटा येथे ओ बी सी समाजाचा रस्ता रोको आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र शासनाने ओबीसी मधून सगे सोयरे या सर्वांना आरक्षण देण्याचा आदेश पारित केला आहे,या आदेशाच्या विरोधात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी वाडिगोंद्री येथे आमरण उपोषण सुरू केले आहेत, सदर उपोषणाबाबत शासन गंभीर नाही, कोणतीही दखल घेतली आहे, याच्या विरोधात आज सकाळी देऊळगाव राजा चिखली राष्ट्रीय महामार्गावरील सिंनगाव फाटा येथेओ बी सी समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केले, या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे,गजानन काकड, दीपक बोरकर, पांडुरंग गिराम, दिनकर वाघ, हरिभाऊ वाघ, शंकर वाघ,अशोक वाघ, द्यानेश्र्वर वाघ, शंकर खरात, आकाश काकड, समाधान काकड, प्रकाश मिसाळ तथा इतर उपस्थित होते.

रस्ता रोको आंदोलन मुळे काही काळ दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता, आंदोलकर्त्यांनी निवेदन तहसिलदार देऊळगाव राजा यांना दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये