ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जादूटोना करण्याच्या संशयावरून मारपीट

एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू,तीन अटकेत.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौशी (बाळापूर) येथे काल दिनांक २० जून रोजी सायंकाळी ७ वाजता आसाराम सदाशिव दोनडकार वय ६७ वर्ष हा आपले घरी असताना आरोपी संतोष मैंद, श्रीकांत मैंद, रुपेश देशमुख हे तिघे त्याचे घरी जाऊन तू जादुखोर आहेस जादू करतो असे म्हणून शिवीगाळ केली आणि त्याला रस्त्यावर ओढून धक्काबुक्की करून हाथा बुक्क्याने मारहाण करीत सिमेंट रस्त्यावर ढकलून दिल्याने तो अर्ध मेल्या अवस्थेत रोडवर पडले असताना त्याला प्राथमिक उपचार करून ब्रम्हपुरी येथील दवाखान्यात मृत घोषित करण्यात आले.

नागभीड पोलीस स्टेशन येथे अप क्र २०९/२४ कलम ३०२,३२३,४५२,५०४,५०६,३४ भा द वी २(१) नरबळी, अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायदा नव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे उप विभागीय पोलिस अधिकारी ठोसरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय राठोड पुढील तपास करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये