Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधी सेवा समिती व तालुका विधीज्ञ संघ, बल्लारपुर यांचे संयुक्त विदयामाने जागतिक योग दिवस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

दि. 21 जून 2024 रोज शुकवारला सकाळी 9-30 वाजता तालुका विधी सेवा समिती व तालुका विधीज्ञ संघ, बल्लारपुर यांचे संयुक्त विदयामाने जागतिक योग दिवस दिवाणी व फौजदारी न्यायालय, बल्लारपुर येथे संपन्न झालेबाबत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे निर्देशान्वये “जागतिक योग दिवस) ” तालुका विधी सेवा समिती बल्लारपुर, तालुका विधिज्ञ संघ बल्लारपुर यांचे संयुक्त विद्यमाने दि. 21 जून 2024 वेळ: सकाळी 9-30 वाजता रोज शुकवारला दिवाणी व फौजदारी न्यायालय बल्लारपुर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले.

सदर कार्यकमास अध्यक्ष म्हणून श्रीमती एस.एन. सावळेश्वरकर, दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, बल्लारपुर, व श्री अनुपम एस. शर्मा, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर बल्लारपुर तसेच बल्लारपुर तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड आय. आर. सय्यद व अधिवक्ता वृंद सोबत न्यायालयीन कर्मचारी योग दिवस कार्यकगात उपस्थित होते.

योग गुरु ऋषिपाल गहलोत, भारत स्वाभिमान पतंजलि योग समिती, बल्लारपुर यांचे मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्वांना योग व त्यांचे फायदेबाबत माहिती मिळाली व सर्वांनी योगाकरुन जागतिक योगादिवस साजरा केला.

सदर कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक योगगुरु यांचे सहकारी किरण दुद्ये, गंगाबाई मल्लोजवार, शिल्पा रावत, विजेता आय व प्रिती पारधी प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच अॅड. सुनिल पुरी.अॅड. विकास गेडाम, अॅड. रणंजय सिंह, अॅड. संदेश हस्ते, अॅड. बालाजी विधाते, कार्यालयीन कर्मचारी, ए.ए. बोडखे, स.अ. रा.वि.कान्हेरे, क.ल., मनोज बगडे, क.लि. कार्यलयीन कर्मचारी सौ.वाय.पी. चिंतलवार, व. लि. यांनी गोलाचा सहभाग दिला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये