Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यापीठातील गैव्यवहारप्रकरणी आमदार अडबाले यांनी धरले धारेवर

आ. अडबाले यांनी घेतली गोंडवाना विद्यापीठात समस्या निवारण सभा

चांदा ब्लास्ट

गोंडवाना विद्यापीठात सुरू होणारे नवीन शैक्षणिक धोरण व लेखा विभागात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार मान. सुधाकर अडबाले यांनी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक २० जून २०२४ रोजी गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत प्राध्यापकांच्या समस्यांबाबत समस्या निवारण सभा व्यवस्थापन परिषद सभागृहात पार पडली. सदर सभा तब्बल पाच तास चालली.

चालू सत्रापासून गोंडवाना विद्यापीठात सुरू होणारे नवीन शैक्षणिक धोरणाबाबत संभ्रम असल्याने यावर दीर्घकाळ चर्चा चालली. आमदार, सिनेट सदस्य व प्राध्यापकांनी प्रश्नांचा भडीमार केला. संस्थाचालक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम, सत्र सुरू होत असताना अभ्यासक्रम तयार नाही, प्राध्यापक अतिरिक्त होतील, यामुळे नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षीपासून लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. चर्चेअखेर शुक्रवारी सायंकाळपर्यंत अभ्यासक्रम वेबसाईटवर अपलोड केले जातील, असे कुरुगुरुंनी सांगितले. लेखा विभागात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारावर आमदार अडबाले यांनी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संबंधित बँकेवर कारवाई करावी. ज्या तीन वेगवेगळ्या चमुंनी लेखा विभागाचे ऑडिट केले, त्यांना ही बाब लक्षात न येणे, ही खूप गंभीर बाब असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करावे, लेखा विभागातील सर्व तत्कालीन अधिकारी / कर्मचारी यांची चौकशी करावी.

सोबतच या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि प्राध्यापकांना प्राप्त न झालेले मानधन तात्काळ देण्यात यावे, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले. यावर ६० दिवसांत टप्याटप्याने मानधन अदा करण्यात येतील, असे लेखा विभागाकडून सांगण्यात आले.

     तसेच विद्यापीठात नियुक्त प्राध्यापकांच्या प्रलंबित वेतनाबाबत व त्यांच्या इतर विषयांवर तसेच गोंडवाना विद्यापीठअंतर्गत चंद्रपूर येथे उपकेंद्र निर्मितीसंदर्भात सद्यस्थिती व इतर विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. अनेक विषयांवर अधिकारी बरोबर उत्तर देऊ शकले नाही. प्रलंबित सर्व प्रकरणे निकाली काढण्यात यावी, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्या. याच विषयांवर ऑगस्ट महिन्यात आढावा सभा घेणार असल्याचे आमदार अडबाले यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र. कुलगुरू कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. अनिल शिंदे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे गडचिरोली जिल्हा कार्यवाह तथा सिनेट सदस्य अजय लोंढे, दीपक धोपटे, प्रा. निलेश बेलखेडे, डॉ. दिलीप चौधरी, डॉ. संजय गोरे, प्रा. विवेक गोर्लावार, डॉ. प्रवीण जोगी, डॉ. मिलिंद भगत, डॉ. सतीश कन्नाके, प्राचार्य डॉ. लडके, प्राचार्य डॉ. वरकड, डॉ. शशिकांत गेडाम, प्राचार्य डॉ. खंगार, डॉ. विजय वाढई, डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. नंदाजी सातपुते व मोठ्या संख्येने प्राध्यापकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये