गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाहेर राज्यातील मोबाईल चोरणारी टोळी हिंगणघाट पोलीसांच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी नामे श्री. प्रदीप हिरानंद दुबानी वय 31 वर्ष रा. यशवंतनगर हिंगणघाट यांनी तोंडी रिपोर्ट दिली की, दिनांक 18/06/02024 रोजी यातील फिर्यादी हे त्यांचे आईला सोडण्याकरीता बसस्थानक हिंगणघाट येथे आले असता व त्याचे आईला बस मधे बसवुन देण्याकरीता बसमधे चढले व बसच्या खाली उतरले. असता फिर्यादीस त्यांचे खिशातील विवो कंपनीचा एक्स 70 प्रो. मोबाईल फोन, Aurora Dawn कलरचा मोबाईल खिशात दिसला नाही.

फिर्यादीचे खिशात असलेला मोबाईल बस मधे चढताना कोणीतरी अज्ञात इसमांने चोरून नेला.अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अनोळखी आरोपी विरूध्द सदरचा गुन्हा नोंद असून सदर गुन्हयांतील अनोळखी आरोपी शोध कामी मा. नुरुल हसन, पोलीस अधीक्षक सा.वर्धा, मा.सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांच्या मागदर्शनात मा. रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधीकारी सा, हिंगणघाट व मा. प्रविन मुंडे, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे बक 1234, पो.ना राहुल साठे बक 859, पो. शि विजय काळे बक 1573, शिवशंकर यादव बक 42, अमोल तिजारे बक 444, आशिष नेवारे बक 187, हे त्याचे पथका सह सायबर शाखा वर्धा येथील पोहवा अनुप कावळे, निलेश कटटोजवार यांचे मदतीने जिल्हा वर्धा व नागपुर येथे रवाना होवून लोकमान्य मेट्रो स्टेशन, हिंगणा नागपुर येथून आरोपी नामे 1) शेख रियाज शेख मुजाहिद वय 23 वर्ष रा.महाराजपुर, डाक बंगला, मोतीझरना ता. तेलझाडी जि. साहेब गंजराज्य झारखंड 2) शेख टिंकु शेख उमर वय 19 वर्ष रा. डाकबंगला, मोतीझरना पोस्ट महाराजपुर ता. तेलझाडी जि. साहेब गंज राज्य झारखंड 3) शेख मुज्जफर शेख नईम वय 19 वर्ष रा. कल्यानी मोजा, पोस्टे महाराजपुर ता.तेलझाडी जि. साहेबगंज राज्य झारखंड यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

आरोपींताकडुन कसुन तपास केला असता गुन्हयातील चोरीस गेलेला व्हिवो 70 प्रो कंपनीचा मोबाईल कि.51,800 रू व आरोपी जवळील 03 मोबाईल कि. 28,300 रू असा एकुन 80,100 रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये