Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जीवनात यश मिळवण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन

आमदार डॉ. राजेन्द्र शिंगणे यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

    प्रत्येकासाठी जीवनात यश मिळवण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. जीवनातील कठीण काळात आव्हानांचा सामना करण्यास मदत करते.उच्च स्तरावरील शिक्षणामुळे लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर आणि वेगळी ओळख मिळण्यास मदत होते. असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेन्द्र शिंगणे यांनी केले.

      स्थानिक आर्या लॉन येथे दि.१६ जून रोजी माजी नगराध्यक्ष कविश जिंतूरकर व माजी नगरसेविका सौ. रिता जिंतुरकर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन व माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा व शासकीय नोकरीस पात्र अधिकाऱ्यांचा अभिनंदन सोहळा व माजी मंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे यांची पुस्तक तुला व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शन म्हणून इन्कम टॅक्स कमिशनर किशोर धुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, उद्योजक मनीष महाजन उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती रामप्रसाद शेळके, शांतीलाल दादा सिंगलकर, ओमप्रकाश धन्नावत, सुबोध मिश्रीकोटकर तसेच प्रमुख अतिथि म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे, गटविकास अधिकारी मुकेश मोहर, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, ठानेदार संतोष महाले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रवजलन सरस्वती पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रामप्रसाद शेळके यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा व शासकीय नोकरीस पात्र अधिकाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. धुळे कदम आणि महाजन यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात मोलाचा मार्गदर्शन केले. पुढे बोलताना माजी मंत्री डॉ.शिंगणे म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. आजच्या काळात शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात. सध्याच्या काळात संपूर्ण शिक्षण पद्धतीच बदलली आहे.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कविश जिंतूरकर व माजी नगरसेविका सौ. रिता जिंतुरकर यांच्या संकल्पनेतून माजी मंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे यांची पुस्तक तुला करुण समाजा समोर एक वेगळा संदेश दिला. ही पुस्तके यूपीएससी एमपीएससी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार आहे ही सर्व पुस्तके नगरपरिषदेच्या अभ्यासिका केंद्रामध्ये उपलब्ध राहणार आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार अर्जुन कुमार आंधळे यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये