Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माकडाच्या हल्ल्यात मजूरदार जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – गेल्या दहा वर्षापासून कोरपना शहरात माकडाने अक्षरशः उच्चाद मांडला आहे. यातच अनेकावर हल्ला चढवल्या च्या घटना घडल्या आहे. याचीच पुनरावृत्ती होत माकडाने एका बांधकाम मजूरदाराला जखमी केल्याची घटना गुरुवार दिनांक १३ ला दुपारच्या सुमारास घडली.

प्रभाग क्रमांक पाच मधील रहिवासी असलेले अली यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. दुपारच्या सुमारास घराचे बांधकाम करत असताना मजूरदार प्रकाश भगवान मेश्राम याच्यावर अचानकरीत्या माकडांनी हल्ला चढवला. पाठीमागून हल्ला केल्याने त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.याच दरम्यान त्यांच्या पाठीवर माकडाने धारदार नखाने बोकडल्याने संपूर्ण पाठ रक्तबबाळ केली. जवळच्या मजूर दार सहकार्याने माकडाला हाकलून लावले. परंतु त्यांची मुजोरी सुरूच होती. जखमी मजूरदार प्रकाश मेश्राम यांना लागलीच घरमालक व सहकार्यानी रुग्णालयात नेऊन उपचार करून घेतले. या घटनेने मात्र शहरात माकडांच्या उपद्रवाची दहशत पुन्हा अधिक वाढली आहे. परंतु याकडे लक्ष देऊन बंदोबस्त करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा याकडे वनविभाग कमालीचे दुर्लक्ष करीत आहे मागील काही दिवसा अगोदर अशीच घटना वाढ नंबर चार मध्ये एका गर्भवती महिलेसोबत घडली होती ती मला घाबरून आपल्या घरामध्येच पडली होती मात्र सुदीवाने त्याला कोणतीच दुप्पट झाली नाही अशा अनेक विविध प्रकारचे घटना घडत असताना सुद्धा याकडे वन विभाग कमालीचे डोळे झाक करीत आहे

 त्यामुळे मोठ्या घटनेची प्रत्येक वेळी वनविभाग वाट पाहणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होते आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये