ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवटोक येथील प्रस्तावित देशी दारू दुकानाला महिलांचा विरोध

देवस्थान मार्गावर दुकान नको-भाविकांची भूमिका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील प्रसिद्ध क पर्यटन दर्जाचे धार्मिक तीर्थस्थान श्री क्षेत्र मुरखंडेश्वर देवस्थान कडे जाणाऱ्या मुख्य चौकातच नवीन देशी दारूचे दुकान होत असल्याची माहिती असून या प्रस्तावित दारू दुकानाला महिलांचा विरोध होत असल्याने या ठिकाणी नको अशी भूमिका समोर येऊ लागली आहे.

सावली तालुक्यात सद्या दारू दुकाने व बार अँड रेस्टारण चा सद्या धुमाकूळ सुरू आहे.कारण शेजारील गडचिरोली जिल्ह्या मध्ये दारू बंदी आहे त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी सावली तालुका या सीमावर्ती भागात सद्या नवीन दुकानाचा जोर वाढू लागला आहे.

त्यातच देवटोक येथील धार्मिक परिसरातील रस्त्यावर ज्या ठिकाणी एकही लोकवस्ती नाही अशा स्थळी जाम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सीमेच्या काठावर नवीन दारू दुकान आणण्याचा प्रस्ताव तालुक्यातील एका नेत्याच्या माध्यमातून झाल्याची चर्चा आहे.सदर नेता हाच जोर लावून त्या ग्रामपंचायत अंतर्गत काही जणांच्या विरोध असतांनाही आर्थिक बळावर ठराव पारित केल्याची चर्चा त्यावेळी होती.मात्र त्यावेळेस पासून आतापर्यंत सदर वेळेपर्यंत या दारू दुकानाचा प्रस्ताव थंड बसत्यात होता मात्र पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याची चर्चा सद्या परिसरात आहे.

मात्र या परिसरातील जनतेनी तीव्र विरोध दर्शविला आहे.प्रसिद्ध मंदिर देवटोक चा हा परिसर दारू चा चौक म्हणून प्रसिद्ध करणार का?असा प्रश्न अनेक महिलांनी केलेला असून लवकर या संदर्भात महिला संघटना विरोधी पक्ष नेते तथा या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार,पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देणार असल्याची माहिती येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये