ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निजामगोंदी येथे गोठ्याला आग

जनावरे व शेती उपयोगी साहित्य जळून खाक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

खिर्डी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या निजामगोंदी येथील कर्णू वाघु मडावी यांचा शेतात असलेल्या वासत्यव्यास असलेल्या झोपडीला आणि गोठ्याला काल रात्रौ ला आग लागल्याने जनावरे व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले.

सर्वे क्र. १२७ येथे मडावी यांचा गोठा होता नेहमी प्रमाणेच ते शेतात जनावरे व शेती उपयोगी साहित्य ठेवत व तिथेच वास्तव्याला असत ते काही कामा निमित्त काल गावाला गेले असता रात्रौ ला ८.३० चा सुमारास अचानक गोठ्याला आग लागली. गोठा हा गावापासून अर्धा किमी दूर असल्याने मोठा भडका झाला तेव्हा गावातील नागरिकाचा लक्षात येता धावा धाव करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतू आगीचा भडका जास्तच व रात्रौ असल्याने गावकरी हतबल झाले शेवटी गडचांदूर नगरपरिषदचे अग्निशमक दल पाचारण करून आग विझविण्याचे काम केले परंतू तोपर्यंत उशीर झाला असल्याने गोठा जळून खाक झाला होता.

गोठ्यात बकऱ्या २० नग, २ वासरे, कोंबड्या ३० नग, १ क्विंटल गहू आणि तांदूळ, पि.वि.सी पाईप २५ नग, १० बॅग खत, व गोठ्यात असलेले इतर शेती उपयोगी साहित्य व उपजीविकेचे सामान जळून खाक झाली. यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे ५ लाख रुपयाचे नुकसान झाले. शेतकरी बाहेर गावी असल्याने आगी चे कारण कळू शकले नाही.पाच लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

तलाठी विकास चिने,डॉ.नरसिंग तेलंगे,पशुधन विकास अधिकारी राजुरा, डॉ.कपिल डेंगे,पशुधन पर्यवेक्षक कवठाळा यांनी पंचनामा केला.

यावेळी दिपक खेकारे उपसरपंच खिर्डी, सुदर्शन डवरे उपसरपंच वडगाव, लिंगु चायकाटी , चीन्नू येडम, विकास चायकाटी, आणि गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

 गोठ्याला आग लागून जनावरे तसेच उपजीविकेचे सामान सुध्दा जळाल्याची माहिती होताच राजुरा नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी तत्काळ शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये