ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मृग नक्षत्राचे पाणी बळीराजाच्या डोळ्यात…

पेरण्या खोडंबल्याने बळीराजा चिंतेत..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

        भारत हा ऋषीप्रधान देश असून भारतीय अर्थव्यस्थेचा प्रमुख कणा शेती आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आणि शेती ही निसर्गाच्या समतोलावर अवलंबून आहे. परंतु या वर्षी जून महिना अर्धा अधिक संपत आला तरी सावली तालुक्यात वरूण राजाचे आगमन न झाल्या मुळे तालुक्यातील पेरण्या खोडमल्या असून बळी राजा चिंतेत असल्याचे विदारक चित्र आहे.

          मृग नक्षत्रात हमखास पडणारा पाऊस नक्षत्र संपत आले तरी अजून पडला नसल्याने बळीराजा पावसाची चातका सारखी वाट पाहत आहे. मृग नक्षत्राचे पाणी न पडल्याने बळीराजा चे पेरण्या पूर्णतः खोडंबल्या असून पावसाची वाट पाहता पाहता बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले असल्याचे चित्र तालुक्याच्या परिसरात दिसत आहे.

हवामान तज्ञांनी या वर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत केले होते परंतु निसर्ग राजांनी हवामान तज्ञाचे संपूर्ण अंदाज सपशेल खोटे ठरवल्याने बळी राजा दुष्काळ तर पडणार नाही ना? या चिंतेने ग्रस्त झाला आहे.

     मागील वर्षी मे अखेर पासून धो-धो बरसणाऱ्या पावसाने या वर्षी ऐन मृग नक्षत्रातच तज्ञाचे अंदाज खोटे ठरवत कलाटणी दिल्याने बळीराजा समोर “संकट”उभे असल्याचे दिसत आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या सुरवातीलाच पेरण्याला सुरवात झाली होती परंतु या वर्षी मात्र जून महिना अर्धा -अधिक संपत आला तरी अजूनही परिसरात पेरणीला सुरवात झाली नसल्याने संपूर्ण तालुका दुष्काळ सदृश्य सावट पसरल्याचे चित्र आहे.

   हवामान तज्ञाच्या अंदाजनुसार या वर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आल्याने सावली परिसरातील बळीराजाने मृग नक्षत्र सुरु होण्यापूर्वीपासूनच आपल्या शेतात खात टाकण्यापासून तर शेती वाहने, शेतातील कचरा जाळणे इत्यादी कामाची पूर्तता करून ठेवली आहे. परंतु मृग नक्षत्राचे पाणी नक्षत्र संपन्याच्या मार्गांवर असताना सुद्धा न पडल्याने बळीराजा “भिजलेल्या डोळ्याने” नक्षत्र बरसण्याची वाट पाहत आहे.

*”मृग नक्षत्र जवळपास कोरडा जात असल्याने शेतकरी वर्गाच्या चिंता वाढल्या आहेत. मागील वर्षी अतिवृष्टी, वैनगंगा नदीला आलेला पूर व पिकावरील रोगराई या मुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गाचे पूर्ण बजेट बिगडले असून या वर्षी ही दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याने चिंता वाढली आहे.”*

                भाऊराव कोठारे, शेतकरी कापसी

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये