ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगांव राजा पोलीस स्टेशनच्या वतीने बस स्थानक परिसरात पाण-पोई सुरू

पोलीस प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

यावर्षी उन्हाळ्यात उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही होत आहे. तहानेमुळे घशाला देखील कोरड बसत आहे. वेळेवर आपली तहान भाविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा शोध घेतला जात आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी पिण्या योग्य नसल्यामुळे नागरिकांचा जिव कासावीस होतांना दिसून येत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची होणारी भटकंती लक्षात घेता देऊळगांव राजा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी नागरिकांना वेळेवर शुद्ध व थंड पाणी मिळावे यासाठी बसस्थानक चौकात पोलीस चौकी जवळ पाण-पोई सुरु करण्यात आली आहे.

या पाण-पोईमुळे आता दररोज शेकडो तहानलेल्याची तहान वेळेवर भागणार असून पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती आता मात्र थांबणार आहे. बुलढाणा पोलीस दलाने हाथी घेतलेल्या पाण- पोईच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल देऊळगांव राजा पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये