Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे जामणी मध्ये जागतिक तंबाखू निषेध दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे सभोवतालील गांवात नवनवीन उपक्रम गावाच्या विकासा करिता राबवित आहे.

आज तंबाखू निषेध दिवस चे औचित्य साधून जामणी या गांवात टाटा कॅन्सर केअर फौंडेशन चंद्रपूर याच्या साहाय्याने एकूण ४५ लोकांची सर्व प्रकारच्या कॅन्सर ची स्क्रिनिंग करण्यात आली व कॅन्सर बद्दल डॉ सुरज सांळूंके द्वारा बहुमुल्ल्य मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.

तसेच गांवातील लोकांची काळजी घेत एकूण ६६ लोकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर पूरक असा औषधोपचार करण्यात आला.

या तपासणीला मानोली उपकेंद्राच्या डॉ स्नेहा मोते व आशा वर्कर रामटेके यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान जामणी गावचे सरपंच जगदीश किन्नाके यांनी बोलताना म्हटले कि अल्ट्राटेक ,माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्वातून नवनवीन उपक्रम आणून गावच्या विकासाकडे लक्ष देत आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

या उपक्रमाला माणिकगड च्या सी. एस. आर. टीम ने यशस्वी करण्यास अथक प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये