Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली (वनसडी) उज्वल यशाची परंपारा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय, सोनुलीं ने फरवरी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग 12 वी व 10 वी चा ऑन लाईन निकाल जाहीर झाला त्यात वर्ग 12 वी चा निकाल 96.96 टक्के लागाला तर वर्ग 10 वी चा 93.33 टक्के लागला.ग्रामीण व दुर्गम भागातील शाळा असून सुद्धा उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली.

वर्ग 12 वी मध्ये प्रथम क्रमांक कु. प्रिया भारत डाहुले 75.17% द्वितीय क्रमांक कु. प्रतीक्षा संतोष सोनटक्के 67.17% तृतीय क्रमांक आशिष सुंग तोडसे 64% यांनी प्राप्त केला.

तर वर्ग १० वी मध्ये प्रथम क्रमांक १) कु. सोनिया इंदल राठोड 81.80% द्वितीय २) कु. उत्कर्षा विनोद गोहोकर 77.२२% २) मयुरी गणेश टोंगे 77.२२ % हिने सुद्धा दुसरा क्रमांक प्राप्त केला. तृतीय ३) कु. रुणाली विजय देवतळे 77.00 % प्राप्त केल.

सदर विद्यार्थी व पालकांना शाळेत निमंत्रित करून 28/05/ 2024 ला पुष्पगुच्छ, बक्षीस, मिठाई व गुणपत्रिका देऊन पालकासह विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पालकांनी व विध्यार्थानी संस्था, शाळा व शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक / प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे शेवठी विज्ञान शिक्षिका कु. सलाम सत्तार कुरेशी यांनी सर्वांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये