Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर पकडला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 27/05/2024 रोजी रात्री 11/30 वा. अल्लीपुर पोलीसांनी ग्राम कोसुर्ला जवळ तुषार खुनकर रा. सोनेगाव (खुनकर) यांचे मालकीचा टँक्टर अवैध वाळु वाहतुक करतांना मिळुन आला. वरुन टॅक्टर चालक नामे किरण हिरामन आडे वय 25 वर्ष रा. सोनेगाव (खुनकर) यांचे ताब्यातील हिरव्या रंगाचा जाँन डिअर कंपनीचा विनाक्रमांकाचा टँक्टर व ट्राली कि.6,00,000/-रुपये व 01 ब्रास वाळु कि.5,000/-रुपये असा एकुन 6,05,000/-रुपयाचा माल जप्त करुन पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे आणन्यात आला.

दिनांक 28/05/2024 रोजी सकाळी 10/00 वा. दरम्यान अल्लीपुर पोलीसांनी गुप्त बातमीवरुन रेड कारवाई केली असता ग्राम बोरगाव (आलोडा) येथे बालु उर्फ अंगज शंकरराव धायडे वय 42 वर्ष रा. बोरगाव (आलोडा) यांचे मालकीचा टॅक्टर अवैध वाळु वाहतुक करतांना मिळुन आला. वरुन टॅक्टर चालक नामे येणोधर बापुजी मुंडकर रा. हळदा ता. ब्रम्हपुरी, जिल्हा- चंद्रपुर हमु. बोरगाव (आलोडा) यांचे ताब्यातील लाल रंगाचा महिंद्र सरपंच कंपनीचा विनाक्रमांकाचा टँक्टर व लाल रंगाची ट्राली कि. 6,00,000/-रुपये व 01 ब्रास वाळु कि.5,000/-रुपये असा एकुन 6,05,000/-रुपयाचा माल जप्त करुन पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे आणन्यात आला.

दोन्ही प्रकरणी मा. तहसिलदार तथा तालुका दंडाधीकारी हिंगणघाट यांना दंडात्मक कारवाईबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मा.श्री. नूरुल हसन, उपविभागिय पोलीस अधीकारी पुलगाव मा.श्री. राहुल चव्हान, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. प्रफुल डाहुले, नापोशी. प्रफुल चंदनखेडे, पोशी. सतिश हांडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये