Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयाची धनश्री तालुक्यात चौथी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा आयोजित एस.एस.सी मार्च 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विदयालयाचा निकाल 97.67% लागला. दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. परीक्षेला 43विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी प्रविण्यासह 11, प्रथम श्रेणीत 19, व्द्वितीय श्रेणित 10 पास श्रेणी 2 उत्तीर्ण झाले.

 धनश्री पुरुषोत्तम समर्थ हि 91%गुण घेत विद्यालयातुन प्रथम, राज अशोक धुळसे 86.60%गुण घेत व्द्वितीय, तर दिपक किशोर नवघडे हा 83%गुण घेत तिसरा आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनचे संस्थेंचे अध्यक्ष गजानन येनगंदलवार, सचिव रवींद्र आडेपवार,शाळेचे संस्थापक विजय आडेपवार, मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक पालक संघांचे पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये