ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बळकट करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य खंगार यांनी घेतला शेकडो समर्थकांसोबत पक्ष प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते पश्चिम विदर्भ संपर्क नेते अरविंद सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनात शिवसेना संपर्कप्रमुख निलेश धुमाळ यांच्या सूचनेनुसार..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात माजी जिल्हा परिषद सदस्य सिंधी मेघे क्षेत्र रमेशभाऊ खंगार यांनी जाहीर प्रवेश करत सिंधी मेघे क्षेत्रात शिवसेना पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी हमी दिली शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा उद्धव साहेबांनी कोरा केला सोबतच कोरोना काळात महाराष्ट्रा च्या जनतेच्या पाठीशी कुटुंबप्रमुख म्हणून उभे राहून लोकप्रिय मुख्यमंत्री चा कर्तव्य पार पाडत संविधान व लोकशाहीच्या रक्षणार्थ नेहमी सातत्याने भूमिका मांडत असल्यामुळे मी शिवसेना पक्षात प्रवेश केला अशी मनोगत खंगार यांनी व्यक्त केले आहे. वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वर्धा विधानसभा क्षेत्रात बळकट होत असून अनेक लोक शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे लवकरच मोठ्या प्रमाणात काही भाजपा चे पदाधिकारी सदस्य मंडळी यांचा प्रवेश शिवसेनेत होणार अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांनी दिली आहे.

यावेळी प्रामुख्याने शिवसैनिक संजू भाऊ पांडे, शिवसैनिक अमित भाऊ भोसले, शिवसैनिक संजू भाऊ निंबाळे, शेखर भाऊ इंगोले, संजय सातपुते, इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये