खडकपूर्णा पात्रात महसूल विभागाची धडक कार्यवाही
अवैध रेती उपसा करणाऱ्या तीन बोटी उध्वस्त
![](https://chandablast.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240522-WA0027-780x470.jpg)
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
तालुक्यातील खडकपूर्णा पात्रातील अवैध रेती उपशाला लगाम लावण्यासाठी महसूल विभागाने आज थेट अवैधपणे रेती उपसा करणाऱ्या बोटी आणि सदर पाईप आणि इतर साहित्य नष्ट केले त्यामुळे अवैधपणे रेती उपसा करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत
सविस्तर वृत्त असे की दिनांक 21 मे रोजी मा.जिल्हाधिकारी बुलढाणा व मा. उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच प्रवीण धानोरकर तहसीलदार सिंदखेडराजा यांच्या उपस्थितीत, जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून खडकपूर्णा धरणामध्ये मौजे चिंचखेड येथे वाळूचे अवैध उत्खनन करणाऱ्या तीन बोटी व त्यांचे साहित्य आणि पाईप्स नष्ट करण्यात आले.
सदरील कामगिरी परीविक्षाधीन नायब तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती. प्रांजल पवार यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी रामदास मांटे, मंडळ अधिकारी ईप्पर, मंडळ अधिकारी वायडे व तलाठी सरिता वाघ, ज्योती लोखंडे, पी.डी. बुरकुल, पी.टी. जायभाये, एस.एस.वाकोडे, एस. टी. हांडे, एम. के. जारवाल, एस.ए.देशपांडे, आकाश खरात, तेजस शेटे, कोतवाल विठ्ठल हरणे, कोतवाल आकाश माघाडे, वाहन चालक एन.बी. उबाळे व वाहन चालक चव्हाण यांनी पार पाडली.